500+ Best Good Morning Marathi Suvichar
Good Morning Marathi Suvichar – या लेखात तुम्ही जवळपास 500+ पेक्षा जास्त मराठी सुविचार संग्रह वाचणार आहात. हे Marathi Suvichar तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा देतील. या मराठी सुविचार संग्रहात तुम्ही success marathi suvichar, life marathi suvichar, inspirational marathi suvichar वाचणार आहात.
Life Changing Suvichar in Marathi
कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
अयोग्य माणसा बरोबर आनंद करण्यापेक्षा योग्य माणसाबरोबर दुःखात राहणे बेहत्तर.
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच
आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका.
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
Motivational Suvichar Marathi Images
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते
सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेली असावी.
व्यक्तिच्या मनात बसत असलेला सलोखा गुण्यागोंविदाने राहणा-या समाजाला प्रतिबिंबीत करीत असतो.
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला बिंधते.
सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते.
श्रध्दावान, बुध्दीवान, कर्तृत्ववान व ऐश्वर्यवान माणसाची ती कोठेही गेली तरी हार्दिक स्वागत होते.
विचारांचा चिराग झाला तर आचार आंधळा बनेल.
जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही,
पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा…. आत्ताच !
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
जगू शकलात तर चंदनासारखे जगाः स्वतः झीजा आणि इतरांना गंध द्या.
दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वतः प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
नव्या बादलीतून पाणी तर गळत नाही ना, याची खात्री होईपर्यंत जुनी बादली फेकून देऊ नये.
जास्त मिळवायचे असेल तर मुळात अपेक्षा कमी मिळविण्याची ठेवा.
ह्दयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही भिकारडाच राहतो.
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य,
काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात.
Success Good Morning Marathi Suvichar
आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
गुणवत्तेच्या दारी पोहचण्याआधी घाम गाळला पाहिजे हेच उत्तम ध्येय ठेवावे.
नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
शस्त्र हे धारण करणा-यालाही घातकच असते.
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल.
लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे.
मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा !
शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.
inspirational Good Morning Marathi Suvichar
आता आपण Good Morning Marathi Suvichar पाहणार आहोत, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात जगण्यासाठी प्रेरणा देते.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
अडचणी आल्याशिवाय खरा मित्र कोण ते कळत नाही.
राग आणि सहनशीलता हे योग्य समंजसपणाचे जुळे शत्रू आहेत.
आपण सुस्वभावी आणि प्रेमळ असल्यास आपोआपच प्रेम मिळते.
मान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी तो देणे होय.
कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
मूर्वांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
नवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात… ते असतात औदुबंराच्या
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात.
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक्त होतो.
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी !
Life Marathi Suvichar
आता आपण Good Morning Marathi Suvichar पाहणार आहोत, जे तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देते.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे.
जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा !
कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
पवित्र असावे पण पतित होऊ नये.
त्याग करावा पण ताठा नसावा.
स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतः शत्रूचीच अधीक भीती असते.
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका,
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
Chote Good Morning Marathi Suvichar
आता आपण Short Good Morning Marathi Suvichar पाहणार आहोत.
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
हसा, खेळा पण शिस्त पाळा !
दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
माणसाचा सगळ्यात मोठा सगुण म्हणजे त्याची माणुसकी.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
अतिथी देवो भव ॥
कविता म्हणजे भावनांचं चित्र !
बाह्यसौंदयपिक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
आधी विचार करा, मग कृती करा.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
अंथरूण बघून पाय पसरा.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ.
अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
श्रध्दा ही सामर्थ्यवान असते.
आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार ?
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
हा लेख Good Morning Marathi Suvichar विषयावर आहे. आम्ही प्रेरक Good Morning Marathi Suvichar, Success Good Morning Marathi Suvichar, Short Good Morning Marathi Suvichar साक्षीदार आहोत.
हे मौल्यवान Good Morning Marathi Suvichar महान संतांनी लिहिलेले आहेत. महाराष्ट्रीय भूमीत अनेक महान महाराज, संत, लेखक जन्माला आले आहेत. हे Good Morning Marathi Suvichar तुम्हाला तुमच्या दु:खातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा देण्यास मदत करतील.
तुम्ही हे Good Morning Marathi Suvichar तुमच्या कुटुंब आणि मित्रांना शेअर करू शकता. तुम्ही हे Good Morning Marathi Suvichar whatsapp, instagram किंवा x वर देखील शेअर करू शकता.
in this blog you can also see suvichar , suvichar in hindi , suvichar in marathi , aaj ka suvichar , Good Thoughts in Hindi , good morning msg in marathi , good morning msg in english, good morning quotes , motivational quotes , thought of the day , good morning status ,marathi suvichar,suvichar marathi,मराठी सुविचार,सुविचार मराठी,चांगले सुविचार,सुविचार मराठी छोटे,marathi ukhane,marathi ukhane for female,marathi ukhane for male,marathi ukhane for male funny,marathi ukhane male,marathi ukhane for female romantic,marathi ukhane for male, romantic,marathi ukhane for bride, marathi ukhane for wife,
marathi ukhane for husband,मराठी उखाणे,ukhane in marathi, ukhane marathi,marathi ukhane,उखाणा मराठी ,Marathi Ukhane For Marriage . marathi suvichar with meaning marathi suvichar short ,marathi suvichar , good morning marathi suvichar, motivational good morning marathi suvichar, Short Good Morning Marathi Suvichar, Whatsapp Good Morning Marathi Suvichar.